कॅबिनेटमंत्री नितेश राणेंच्या भव्य दिव्य स्वागताची खारेपाटण येथे जय्यत तयारी सुरू

राज्याचे नवनिर्वाचित कॅबिनेट मंत्री नितेश राणे हे 22 डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होणार असून मंत्री झाल्यानंतर नितेश राणे हे पहिल्यांदा सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत असल्याने त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी खारेपाटण येथे करण्यात आली आहे. तसेच जिल्हा भाजपा कडून देखील जिल्ह्यात तयारी करण्यात येत आहे. खारेपाटण वरचा स्टॅन्ड येथे कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांचा नागरी सत्कार केला जाणार असून,खारेपाटण येथे सकाळी 9:30च्या सुमारास मंत्री नितेश राणे यांचे आगमन होणार आहे.खारेपाटण येथे करण्यात येणाऱ्या सत्कार साठी खारेपाटण -तळेरे विभागाच्या सर्व भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते या स्वागताची जय्यत तयारी करत आहेत. या स्वागताच्या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेश द्वार खारेपाटण पासून सर्वत्र मंत्री नितेश राणे यांच्या स्वागताचे भले मोठे बॅनर लागले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मंत्री नितेश राणे यांचे भव्य दिव्य स्वागत केले जाणार असून,स्वागतच्या वेळी भव्य फुलांचा वर्षाव करण्यात येणार असून नेत्र दीपक असा हा सत्कार सोहळा करण्यात येणार आहे.तसेच जिल्ह्याच्या प्रवेश द्वार तथा खारेपाटण पासून ते संपूर्ण जिल्ह्यात जागोजागी भाजपाच्या झेंड्यांनी वातावरण भाजपमय केले जाणार आहे. खारेपाटण येथे होणाऱ्या कॅबिनेट मंत्री राणे याच्या तयारी साठी सर्वच पदाधिकारी, कार्यकर्ते, कसून तयारी करत आहेत.महायुती मधील घटक पक्ष देखील या स्वागत सोहळ्यास सहभागी होणार असल्याची माहिती मिळतं आहे.यासोबत सिंधुदुर्ग जिल्ह्यासह प्रत्येक तालुक्यामध्ये भाजपाच्या बैठका घेतल्या गेल्या असून असून जास्तीत जास्त भाजपा कार्यकर्ते, पदाधिकारी व जनसमुदाय या स्वागत व सत्कार सोहळ्यात सहभागी होणार असल्याची माहिती मिळतं आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!