यशवंत हरयाण यांच्याकडून खारेपाटण हायस्कूलला सातशे पुस्तके भेट

मातोश्री सीताबाई सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व समाजसेवक यशवंत हरयाण यांनी नुकतीच खारेपाटण हायस्कूलला भेट दिली. त्यावेळी त्यांनी प्रशालेला विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त अशी सुमारे सातशे पुस्तके भेट दिली. तसेच यापुढे देखील सर्वतोपरी प्रशालेला सहकार्य करण्याची ग्वाही दिली. त्याबद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री संजय सानप, पर्यवेक्षक श्री संतोष राऊत, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे आभार मानले . त्यांच्या या योगदानाबद्दल खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री प्रवीण लोकरे उपाध्यक्ष श्री भाऊ राणे सचिव श्री महेश कोळसुलकर, सर्व संचालक मंडळ यांनी देखील त्यांचे आभार मानले .

error: Content is protected !!