पळसंब नाॅट रिचेबल भागात पोहोचणार मोबाईल नेटवर्क

डिगीवाडी येथे मोबाईल टॉवरचे भूमिपूजन

पळसंब येथे डोंगराळ भागामुळे मोबाईल नेटवर्क ला समस्या निर्माण होत होती.याबाबत शुक्रवारी पळसंब येथ डीगीवाडी भागात बीएसएनएल च्या दुसरया टॉवरचे भूमिपूजन झाल्याने पळसंब संपूर्ण गाव आता मोबाईल नेटवर्क च्या कक्षेत येणार आहे.
या टॉवर च्या कामाचे भूमिपूजन
पळसंब गावचे सरपंच महेश वरक यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य सत्यवान तेजम, तसेच वाडीतील ग्रामस्थ अनिल तेजम, मधुकर जोईल, प्रशांत तेजम,सुशांत तेजम, योगेश तेजम, सदानंद तेजम, रामदास सरमळकर तसेच भारत संचार निगम लिमिटेड चे अधिकारी आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!