कनेडी नाटळ विभागीय कार्यालयाजवळ ख्रिस्ती बांधवांच्या प्रकाश यात्रेचे स्वागत
माजी जि. प. अध्यक्ष गोट्या सावंत, संजना सावंत यांचा उपक्रम
25 डिसेंबर रोजी साजरा होणाऱ्या ख्रिस्ती धर्माच्या नाताळ सण व येशू जन्म च्या निमित्ताने कनेडी बाजारपेठ येथे प्रकाश यात्रा काढण्यात आली. भाजप नाटळ सांगवे विभागीय कार्यालय कनेडी बाजारपेठ येथे माजी जि प अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत व सौ संजना संदेश सावंत यांच्या वतीने ख्रिस्ती बांधवाना अल्पोपहार चे वाटप करण्यात आले. येशू जन्म च्या निमित्ताने ही प्रकाश यात्रा काढण्यात येते. शनिवारी सायंकाळी रोझरी चर्च ते कनेडी बाजारपेठ अशी काढण्यात आलेल्या या प्रकाश यात्रेत कनेडी दशक्रोशीतील ख्रिस्ती बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तसेच येशू जन्म चा देखावा ही सादर करण्यात आला. या अल्पोपहार वाटपा बद्धल ख्रिस्ती बांधवानी संदेश उर्फ गोट्या सावंत यांना धन्यवाद दिले.यावेळी सांगवे सरपंच संजय उर्फ बाबु सावंत, उपसरपंच प्रफुल्ल काणेकर, गांधीनगर सरपंच मंगेश बोभाटे तसेच भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.