ज्ञानापेक्षा चारित्र्य श्रेष्ठ चारित्र्य संपन्न जीवन जागा- श्री.अजयकुमार सर्वगोड
कणकवली/मयूर ठाकूर
ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज वरवडे या प्रशालेच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते त्यांच्याच शुभहस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन संपन्न झाले.त्याचप्रमाणे कणकवली पंचायत समितीचे माजी सभापती श्री.सुरेश सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. स्कॉलरशिप, एम.टी. एस. अशा स्पर्धा परीक्षांमध्ये तसेच बुद्धीबळ तायक्वांदो, योगा, वक्तृत्व ,प्रश्नमंजुषा, चित्रकला अशा विविध स्पर्धांमध्ये जिल्ह्यात व राज्यस्तरावर यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. प्रशालेमध्ये झालेल्या वार्षिक क्रीडा महोत्सवातील वैयक्तिक व सांघिक खेळातील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने ” साने गुरुजी कथानमाला” यांच्या वतीने दरवर्षी मोठ्या प्रमाणात “श्यामची आई”या पुस्तकावर घेतल्या जाणाऱ्या परीक्षेत प्रशालेचे विद्यार्थी भरघोस यश संपादन करतात याचेच फलित म्हणून “सानेगुरुजी कथानमाला ” यांच्या वतीने आयडियलच्या मुख्याध्यापिका सौ.अर्चना शेखर देसाई आणि प्रशालेच्या शिक्षिका सौ. श्वेता गावडे मॅडम यांच्या मानसन्मान करण्यात आला. यानिमित्ताने प्रशालेतील मुलांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी चित्रांचे प्रदर्शन (आर्ट गॅलरी )भरविण्यात आली होती त्याचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते पार पडले या यामधील यशस्वी विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले या सर्व कार्यक्रमाची श्री.अजय कुमार सर्वगोड (कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवली )श्री.सुरेश सावंत माजी पंचायत समिती कणकवली ज्ञानदा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ विद्याधर तायशेटे सर, उपाध्यक्ष श्री.मोहन सावंत सर ,कार्याध्यक्ष श्री.बुलंद पटेल सर, संस्थापक सचिव प्राध्यापक हरिभाऊ भिसे सर,प्राध्यापक श्री.निलेश महेंद्रकर सर,सल्लागार श्री.डी.पी तानावडे सर,मुख्याध्यापिका सौ. अर्चना शेखर देसाई, श्री.वळंजु सर, पी. टी. ए. मेंबर सौ. चराटे मॅडम, सौ.कुडाळकर मॅडम, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यक्रमांतर्गत संध्याकाळी पालकांसाठी “आयडियल पेरेंट्स उत्सव “संपन्न झाल्या यामध्ये पालकांनी नृत्य ,फॅन्सी ड्रेस ,आणि गायन स्पर्धेत सहभाग घेतला होता या स्पर्धेतील द्वितीय आणि तृतीय विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.हेमंत पाटकर सर आणि सौ.शीतल बांदल मॅडम यांनी केले.