सामाजिक जाणिवेतून केलेले कार्य कौतुकास्पद–सरपंच जेराॅन फर्नांडिसआचरा येथे वाहनचालकांसाठी आयोजित आरोग्य शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद

आचरा–अर्जुन बापर्डेकर

निस्वार्थी पणे रुग्ण सेवा देणारे डॉ सकपाळ आणि डॉ भोगटे दांपत्य यांनी सामाजिक जाणिवेतून वाहन चालकांसाठी आयोजित आरोग्य शिबीर वाहन चालकांच्या आरोग्याची काळजी घेणारा आहे. त्यांचा हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे मत आचरा सरपंच जेराॅन फर्नांडिस यांनी व्यक्त केले.
आचरा येथील डॉ सिद्धेश सकपाळ, डॉ स्वप्निल भोगटे, डॉ स्वरा भोगटे यांनी
तीन आसनी, सहा आसनी रिक्षा चालक, खासगी बस चालक-मालक व कर्मचारी यांच्यासाठी मोफत मधुमेह तपासणी व आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन केले होते.त्याचे उद्घाटन आचरा सरपंच जेराॅन
फर्नांडिस यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते .यावेळी त्यांच्या सोबत
माजी सरपंच मंगेश टेमकर, आचरा प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. कपिल मेस्त्री, तीन आसनी रिक्षा संघटनेचे अध्यक्ष सचिन परब, जिल्हा सहा आसनी संघटनेचे खजिनदार विजय सावंत यांसहतीन आसनी व सहा आसनी संघटनेचे पदाधिकारी,आचरा येथील फार्मासिस्ट मांगिरीश सांबारी, विदयानंद परब आदी मान्यवर उपस्थित होते.

गणेश चतुर्थीत गावी येणारया चाकरमानी व गावकऱ्यांच्या सेवेसाठी वाहनचालक 

तहान भूक विसरून आपला घरचा सण बाजूला ठेवून गणेशोत्सवाचा आनंद इतरांना मिळण्यासाठी सारथ्य करत असतात आणि म्हणूनच त्यांच्या आरोग्याची काळजी घेणं ही आम्ही आमची जबाबदारी समजतो याच जाणिवेतून आम्ही डॉ स्वरा स्वप्निल भोगटे दांपत्य आणि मी मोफत मधुमेह व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले असल्याचे डॉ सिद्धेश सकपाळ यांनी यावेळी सांगितले.या शिबिराचा आचरा येथील ५२ तीन आसनी, सहा आसनी रिक्षा चालक आणि खासगी बस सेवा चालक व कर्मचारी बांधवानी लाभ घेतला.

error: Content is protected !!