कुरंगवणे गाव म.गांधी तंटामुक्त समिती अध्यक्षपदी श्री महेंद्र कदम यांची निवड

कणकवली तालुक्यातील कुरंगवणे या गावच्या म.गांधी तंटामुक्त समिती अध्यक्षपदी या गावातील रहिवासी व युवा कार्यकर्ते श्री महेंद्र सीताराम कदम यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे खारेपाटण दशक्रोशित सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
कुरंगवणे – बेर्ले या ग्रुप ग्रामपंचायतीची ग्रामसभा नुकतीच गावचे सरपंच श्री पप्पू ब्रम्हदंडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.या सभेत श्री महेंद्र कदम यांची सर्वानुमते ग्रामस्थांच्या वतीने म. गांधी तंटामुक्त समिती अध्यक्षपदी निवड करण्यात आली.यावेळी उपसरपंच श्री.बबलू पवार,ग्रा.पं. सदस्य श्रीम.विशाखा राऊत,अक्षदा सादीकले,स्नेहा गोसावी,श्री रवींद्र पवार,सोसायटीचे व्हॉईस चेअरमन रवींद्र लाड,माजी सरपंच बाळा राऊत,माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष भालचंद्र लाड,ग्रामसेवक श्री गिरीश धुमाळे,ग्रामस्थ सोनाली पवार,मधुकर पवार,वैष्णवी पवार आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी गावच्या वतीने सरपंच श्री पप्पू ब्रम्हदंडे व उपसरपंच बबलू पवार यांनी नवनियुक्त तंटामुक्त समिती अध्यक्ष श्री महेंद्र कदम यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
श्री.महेंद्र कदम हे कुरंगवणे बौद्ध विकास स्थानिक मंडळाचे कार्यकर्ते असून बौद्धजन सेवा संघ विभाग खारेपाटण या १२ गाव संघटनेचे देखील ते सेक्रेटरी म्हणून सध्या काम करत आहे.कुरगवने गावच्या सर्व ग्रामस्थांचे मी आभारी असून गावच्या वतीने मला देण्यात आलेली जबाबदारी आपण सर्वांना विश्वासात घेऊन पार पाडू.अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित कुरंगवणे गाव म.गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष श्री महेंद्र कदम यांनी व्यक्त केली.

error: Content is protected !!