खारेपाटण येथील म.रा.वि.पारेषण कंपनीचे सहाय्यक अभियंता किशोर मर्ढेकर यांचा सदिच्छा समारंभ संपन्न..
खारेपाटण येथील महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी सहायक अभियंता शाखा कार्यलय रामेश्वर नगर,खारेपाटण येथे वीज अधिकारी म्हणून कार्यरत असलेले श्री किशोर श्रीकृष्ण मर्ढेकर यांची नुकतीच शाखा अधिकारी खेर्डी शाखा कार्यालय ता.चिपळूण जि. रत्नागिरी येथे प्रशासकीय बदली झाली असून खारेपाटण शाखा कार्यालयाच्या कर्मचारी व ग्रामस्थांच्या वतीने नुकताच त्यांचा सदिच्छा समारंभ कार्यक्रम संपन्न झाला.
खारेपाटण ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच सौ प्राची ईसवलकर उपसरपंच श्री महेंद्र गुरव व ग्रा.पं सदस्य जयदीप देसाई,किरण कर्ले, सुधाकर ढेकणे,सौ.मनाली होनाळे, दक्षता सुतार, अस्ताली पवार यांनी किशोर मर्ढेकर साहेब याना भेट वस्तू देऊन त्यांचा सत्कार केला व त्यांच्या पुढील प्रशासकीय सेवेसाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला मालवण कट्टा विज शाखा कार्यालयाचे शाखा अधिकारी सुजित शिंदे,खारेपाटण शाखा कार्यालयाचे मुख्य तंत्रज्ञ श्री परब मेस्त्री,प्रधान यंत्र चालक रुपेश चव्हाण,वरिष्ठ तंत्रज्ञ अनिकेत जाधव, खारेपाटण महापारेषण उपकेंद्र येथील तंत्रज्ञ श्री रवी जाधव, बाह्यस्तोत्र कर्मचारी सुरेश तळेकर मेस्त्री,मुख्य तंत्रज्ञ लंगडे मेस्त्री तसेच सर्व विद्युत महावितरण व महापारेषण विभागाचे कर्मचारी वृंद उपस्थित होते.यावेळी सर्व वीज कर्मचाऱ्यांच्या वतीने साहयक अभियंता श्री किशोर मर्ढेकर साहेब यांचा शाल श्रीफळ तसेच पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.तर करवीर निवासी महालक्ष्मीची प्रतिमा आणि छ.शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट वस्तू म्हणून देण्यात आली.
किशोर मर्ढेकर हे मुळगाव ओसरे ता.जावळी जिल्हा सातारा येथील रहिवासी असून त्यांची नोकरीची सुरवातच खारेपाटण येथील शाखा कार्यालयात सहाय्यक अभियंता म्हणून २०१६ पासून झाली
सलग ७ वर्षे ७ महिने खारेपाटण येथे सेवा झाल्यानंतर नुकतीच त्यांची बदली चिपळूण खेर्डी येथे झाली आहे. गेल्या ७ वर्षाच्या काळात किशोर मर्ढेकर साहेब यांनी खारेपाटण मध्ये चागल्या प्रकारे काम केले असून रात्री अपरात्री नैसर्गिक व तांत्रिक कारणांनी वीज पुरवठा खंडित झाल्यास पूर्ण वेळ देऊन प्रामाणिक सेवा केली आहे.यावेळी त्यांना शुभेछा देताना सर्वच कर्मचारी भावूक झाले.
श्री काळभैरवनाथच्या कृपेने खारेपाटण सारख्या ऐतिहासिक शहरात आपल्याला काम करण्याची मला संधी मिळाली हे मी माझे भाग्य समजतो.या संपूर्ण सेवेच्या काळात मला सहकार्य करणाऱ्या ग्रामस्थांचे व राजकीय व्यक्तींचे पत्रकार मित्रांचे व माझ्या सहकाऱ्यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो असे भावपूर्ण उदगार सत्कारला उत्तर देताना श्री किशोर मर्ढेकर यांनी काढले.