जिल्हावासियांना गणेश चतुर्थी कालावधीत चांगली सेवा द्या-शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांचे प्रशासनाला आव्हान.

गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर विविध प्रश्नांवर वेधले प्रशासनाचे लक्ष.

कणकवली/मयूर ठाकूर.

गणेश चतुर्थी हा कोकणातील सर्वात मोठा सण आहे.या उत्सवाच्या निमित्ताने लाखो गणेश भक्त कोकणात येत असतात.आणि अश्या वेळी जिल्ह्यातील मूलभूत सुविधा नागरिकांना मिळाव्यात यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी पत्रकार परिषदेतून विविध प्रश्नांवर प्रशासनाचे लक्ष वेधले.
मुंबई-गोवा हायवे गेले कित्येक वर्ष रखडलेल्या स्थितीत आहे.चाकरमानी या रस्त्याने मोठ्या संख्येने येणार आहेत. तसेच जिल्ह्याला जोडणारे सर्व घाट हे देखील खड्डेमय झाले आहेत.जिल्ह्यातील जनतेला याचा नाहक त्रास सहन करावा लागतो.एस टी गाड्या या काही प्रमाणात सुस्थितीत नाहीत. Bsnl चे टॉवर जिल्ह्यात बसवण्यात आलेत परंतु आवश्यक असे नेटवर्क त्यातून मिळत नाही यासंदर्भात प्रशासनाने लक्ष घालून वेळीच मार्ग काढावा. तसेच ग्रामीण भागातील रस्ते सुरळीत करावेत, सर्वजिक स्वछता गृह सुधारावीत आणि गणेश चतुर्थी निमित्त येणारे चाकरमानी तसेच जिल्हावासीय यांना प्रशासनाकडून मूलभूत सुविधा मिळाव्यात अशी आग्रही मागणी पत्रकार परिषदेतून संदेश पारकर यांनी केली.

error: Content is protected !!