सिंधुदुर्गात उद्या महाराष्ट्र बंदची हाक

महाविकास आघाडीकडून बंदच्या पार्श्वभूमीवर बैठक घेत नियोजन

महाराष्ट्राच्या सुसंस्कृतीसाठी व लेकी बाळींच्या सुरक्षेसाठी महाविकास आघाडी व इंडिया आघाडीच्या वतीने 24 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर याबद्दलचे बॅनर कणकवली शहरात ठीक ठिकाणी लागले असून ज्यांच्याकडे संवेदनशील मन आहे त्या प्रत्येकाने या बंदमध्ये सामील व्हा असे आवाहन महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे. महाविकास आघाडीची या अनुषंगाने नियोजनाची बैठक आज विजय भवन या ठिकाणी घेण्यात आली. या बैठकीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार या पक्षांचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्या या बंदची काय पार्श्वभूमी असणार ते पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

error: Content is protected !!