तालुका स्तरीय कबड्डी स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल आचरा प्रथमशाळा समिती कडून विद्यार्थ्यांचा गौरव

मालवण तालुका शालेय क्रीडा स्पर्धा17 वर्षाखालील मुलगे कबड्डी स्पर्धेमध्ये सलग चार सामने जिंकून कबड्डी स्पर्धेत आचरा हायस्कूल चा संघाने मालवण तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला असून त्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. याबाबत न्यू इग्लिश स्कूल आचराच्या स्थानिक स्कूल समिती कडून विजेत्या मुलांचा गौरव करण्यात आला. यावेळी स्थानिक स्कूल समिती अध्यक्षा निलिमा सावंत,सदस्य राजन पांगे, बाबाजी भिसळे, अर्जुन बापर्डेकर, संजय पाटील,मुख्याध्यापक गोपाळ परब, उप मुख्याध्यापक घुटूकडे, प्रकाश महाभोज, पाटील सर, यांसह अन्य शिक्षक उपस्थित होते.





