असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा कायदा लागू करा
महाराष्ट्र प्रदेश संघटक मंत्री बाळासाहेब भुजबळ यांचे प्रतिपादन
भारतीय मजूर संघाचे त्रैवार्षिक अधिवेशन कणकवलीत
भारतीय मजदूर संघ सिंधुदुर्ग असंघटित कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी भारतीय मजदूर संघ रस्त्यावर उतरणार असे बाळासाहेब भुजबळ महाराष्ट्र प्रदेश संघटक मंत्री यांनी सांगितले. कणकवली महाराष्ट्रातील पाच कोटी कामगारांपैकी जवळजवळ चार कोटी कामगार हे असंघटित क्षेत्रात काम करीत असून या कामगारांना कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही. सदर कामगारांना सामाजिक सुरक्षा कायदा लागू करण्याची मागणी भारतीय मजदूर संघाचे प्रदेश संघटक मंत्री बाळासाहेब भुजबळ यांनी प्रतिपादन केले. भारतीय मजूर संघ सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्याचे त्रैवार्षीक जिल्हा अधिवेशन कणकवली येथील उत्कर्ष हॉल येथे संपन्न झाले. यात्रेवार्षिक अधिवेशनाचे उद्घाटक प्रदेश सचिव श्री. हरि चव्हाण अध्यक्ष बांधकाम कामगार संघ महाराष्ट्र प्रदेश श्री बाळासाहेब भुजबळ महाराष्ट्र प्रदेश संघटक मंत्री श्री भगवंता कोकण विभाग संघटक मंत्री श्री विकास गुरव जिल्हाध्यक्ष सिंधुदुर्ग श्री सत्यविजय जाधव जिल्हा सचिव श्री सुधीर ठाकूर कोषाध्यक्ष जिल्हा सिंधुदुर्ग यांच्या शुभहस्ते अधिवेशनाचे उद्घाटन झाले. वंदना तावडे यांच्या श्रमिक गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली त्रिवार्षिक अधिवेशनाचे प्रस्ताविक श्री विकास गुरव यांनी केले तर गेल्या तीन वर्षात झालेल्या झालेल्या विविध कार्यक्रमाचे इतिवृत्त श्री सत्यविजय जाधव यांनी सर्वांसमोर ठेवले तीन वर्षाचा आर्थिक हिशोब श्री सुधीर ठाकूर यांनी सर्वांच्या यांच्यासमोर मांडला या अधिवेशनात पाच ठराव सर्वांच्या समोर मांडण्यात आले सर्व क्रमांक 1) असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा लागू करा ठराव क्रमांक 2) बांधकाम कामगारांना मंडळाचे लाभ व प्रमाणपत्र मिळण्यासाठी शासनाकडून कार्यवाही होण्याबाबत ठराव क्रमांक 3) घरेलू कामगार कल्याणकारी मंडळ पूर्ववत करून कल्याणकारी योजना ची अंमलबजावणी करण्याबाबत ठराव क्रमांक 4) कामगार कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करा ठराव क्रमांक 5) महाराष्ट्रातील विविध कामगार कायद्याअंतर्गत मंडळ आणि समितांचे पुनर्गठन त्वरित करा वरील सर्व ठरावांवर साधक बादक चर्चा होऊन सर्वांच्या संमतीने ठराव संपन्न करत ते राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार असल्याचे माहिती कोकण विभाग संघटक मंत्री भगवान साटम यांनी उपस्थितीना माहिती दिली अधिवेशनात पुढील तीन वर्षाकरिता नवीन कार्य करणे निवड करण्यात आली यामध्ये श्री सत्यविजय जाधव यांची जिल्हाध्यक्ष सिंधुदुर्ग तर जिल्हा सचिव म्हणून श्री हेमंत कुमार परब यांची निवड करण्यात आली सदर कार्य करणे पुढील प्रमाणे श्री अशोक घाडीगावकर उपाध्यक्ष वंदना तावडे उपाध्यक्ष राजेंद्र आरेकर उपाध्यक्ष शुभांगी सावंत सहसचिव प्राची परब सहसचिव ओमकार गुरव कोषाध्यक्ष दत्ताराम घाडीगावकर कार्यालय प्रमुख रिमा इर्लेकर सदस्य नंदू झाड सदस्य प्रताप वाडेकर सदस्य महेश सुर्वे सदस्य संचिता ठाकूर सदस्य गणेश वाळवे सदस्य आयाराम प्रमुख 1) पर्यावरण= राजेंद्र आरेकर 2) कुटुंब प्रबोधन= वंदना तावडे 3) सामाजिक समरसता =भगवान साटम 4(स्वावलंबी भारत= सुधीर ठाकूर 5) महिला कार्य= वृषाली बागवे, प्राची परब : या सर्वांची निवड सर्वानुमते करण्यात आली भारतीय मजदूर संघ 70 व्या वर्षात पदार्पण करत असून भारतीय मजूर संघाच्या रिती निती प्रमाणे गेले 70 वर्ष अखंडपणे काम करत असून देशातील प्रथम क्रमांकाची कामगार संघटना असा नावलौकिक मिळवलेले आहे सर्वात प्रथम देश नंतर उद्योग व शेवटी कामगार या त्रिसुत्रा क्षेत्राच्या च्या आधारे संघटना काम करीत असून कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नाबाबत भविष्यात काळात रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करणार असल्याने प्रतिपादन प्रदेश सचिव श्री हरिभाऊ चव्हाण यांनी भाषणात संबोधित केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सत्यविजय जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री हेमंत कुमार परब यांनी केले त्रिवार्षिक जिल्हा अधिवेशनात सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने विविध तालुक्यातील त्यामध्ये प्रामुख्याने बांधकाम कामगार घरेलू कामगार अंगणवाडी कर्मचारी आशावर जिल्हा परिषद कर्मचारी रिक्षा चालक व जिल्हा परिषद कर्मचारी विविध बँकेमध्ये काम करणारे कर्मचारी वीज मंडळातील कंत्राटी कामगार एसटी महामंडळ तील कामगार व नगरपंचायत कामगार आरोग्य कर्मचारी पुरुष कामगार मोठ्या संख्येने उपस्थितीत होते जिल्हा अधिवेशन यशस्वी करण्यासाठी माजी जिल्हाध्यक्ष विकास गुरव नेतृत्वाखाली दत्ताराम घाडीगावकर, श्री अशोक घाडीगावकर, राजेंद्र आरेकर, जयश्री मढवळ, वंदना तावडे, शुभांगी सावंत, वृषाली बागवे, रिमा हिरलेकर इत्यादी कार्यकर्त्याने कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.