जिल्हास्तरीय शालेय तलवार बाजी क्रीडा स्पर्धेत विद्यामंदिर हायस्कूल चे यश
संस्था पदाधिकाऱ्यांनी केले यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक
१९ ऑगस्ट २०२४ रोजी पार पडलेल्या, क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग आणि सिंधुदुर्ग
जिल्हा फेन्सिंग असोसिएशन द्वारा आयोजित जिल्हास्तरीय शालेय फेन्सिंग(तलवार बाजी) क्रीडा स्पर्धापार पडल्या. या स्पर्धेमध्ये इंग्लिश मीडियम स्कूल कणकवलीच्या विद्यार्थ्यांनी भरघोस यश संपादन केले. या स्पर्धेमध्ये
१. प्रीती पांडुरंग दळवी. (तलवारबाजी- फाॅईल-प्रथम क्रमांक)
२. जानवी संदीप लोकरे. (तलवारबाजी- सेबर- प्रथम क्रमांक)
३. आर्या आनंद आचरेकर. (तलवारबाजी-सेबर- द्वितीय क्रमांक)
४. जानवी संदीप लोकरे. (तलवारबाजी-ईपी- द्वितीय क्रमांक)
५. दिव्या आत्माराम नार्वेकर. (तलवारबाजी- फाॅईल- तृतीय क्रमांक)
६. आदित्य गुरुदास जाधव. (तलवारबाजी- ईपी- तृतीय क्रमांक)
७. उत्कर्ष उमेश डावरे. (तलवारबाजी -सेबर -तृतीय क्रमांक)
अनुक्रमे यश संपादन केले. या सर्व विद्यार्थ्यांची तलवारबाजी विभागीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे.
या तलवारबाजी क्रीडा स्पर्धेसाठी कणकवली इंग्लिश मीडियम स्कूलचे क्रीडा शिक्षक आनंद सुतार सर तसेच इतर सर्व शिक्षक वृंदाचे मार्गदर्शन लाभले. या स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना विद्यामंदिर हायस्कूलचे मुख्याध्यापक डॉ. श्री. पी. जे. कांबळे सर, जेष्ठ शिक्षक श्री. अच्युतराव वणवे सर , पर्यवेक्षिका सौ. वृषाली जाधव तसेच विद्यामंदिर इंग्लिश मेडीयम स्कूल च्या मुख्याध्यापिका सौ. दिव्या सावंत तसेच पर्यवेक्षिका सौ. श्रुती बावकर यांनी शुभेच्छा दिल्या. या यशाचे कौतुक शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन सौ. राजश्री साळुंखे, सेक्रेटरी वळंजू, तसेच संस्थेचे अध्यक्ष श्री. तवटे यांनी केले.