बीडवाडी, वरवडे, पिसेकामते समन्वय विकास समितीतर्फे भव्य तालुकास्तरीय गणेश सजावट स्पर्धा

1 सप्टेंबर पर्यंत स्वीकारण्यात येणार अर्ज
आमदार नीतेश राणे यांच्या संकल्पनेतून व प्रेरणेतून स्थापन करण्यात आलेल्या बीडवाडी, वरवडे, पिसेकामते समन्वय विकास समितीच्यावतीने भव्य गणेश सजावट स्पर्धा २०२४ आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धा कणकवली तालुकास्तरीय असून विजेत्या पहिल्या तीन क्रमांकांना अनुक्रमे २१ हजार, १५ हजार आणि ११ हजार रु. तसेच प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
नुकतीच बीडवाडी, बरवडे आणि पिसेकामते या गावांची समन्वय समिती स्थापन करण्यात येऊन अध्यक्षपदी अनंत मगर यांची निवड करण्यात आली. या समितीच्या माध्यमातून विकासकामांसाठी प्रयत्न करण्यात येणार आहेतच, याशिवाय विविध उपक्रमही राबविण्यात येणार आहेत. याचेच पहिले पाऊल म्हणून गणेश सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
गणेश सजावट स्पर्धेसाठी १ सप्टेंबरपर्यंत फॉर्म स्वीकारले जाणार आहेत. स्पर्धेत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे वगळून इतर सहभागी होऊ शकतात. पहिल्या ३२ स्पर्धकांनाच सहभागी करून घेतले जाणार आहे. गणेश मूर्ती शाडू माती, इको फ्रेंडली असणे आवश्यक आहे. गणेश मूर्तीच्या ठिकाणी देखावे, चित्र यामध्ये नैसर्गिकता, पर्यावरणाचा उपयोग केलेला असावा. नोंदणी केलेल्या स्पर्धकांच्या घरी बीडवाडी, वरवडे, पिसेकामते समन्वय विकास समितीचे सदस्य, परीक्षक भेट देऊन परीक्षण करतील. स्पर्धेचा निकाल अनंत चतुर्दशीनंतर आठ दिवसांत जाहीर करण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी पाचशे रु. प्रवेश फी असून नियमांमध्ये बदल करण्याचा अधिकार समितीकडे असणार आहे. अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी अनंत मगर (९४२२९९७८८५), सोनू सावंत (९४२३३०००७५), सुहास राणे (९०२१४९८७९७) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, आमदार नीतेश राणे यांच्या प्रेरणेतून स्थापन करण्यात आलेल्या या समितीची स्पर्धेच्या नियोजनासाठी नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीला अनंत मगर यांच्यासह उपाध्यक्ष सोनू सावंत, सुहास राणे, खजिनदार प्रकाश सावंत, सचिव आनंद साटम तसेच संजय साळसकर, पांडुरंग मगर, रवी राणे, संजय तांबे, दिवा मेस्त्री, गणेश सावंत, अनिल गुरव, उमेश जांभवडेकर आदी उपस्थित होते.
तालुक्यातील जास्तीत जास्त गणेश भक्तांनी यात सहभाग घ्यावा, असे आवाहन समितीच्यावतीने करण्यात आले आहे.
कणकवली प्रतिनिधी