जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा पळसंब येथे स्वातंत्र्यदिन मोठा उत्सहात साजरा३
डॉ भोगटे कुटुंबाकडून शैक्षणिक साहित्य वाटप
प्राथमिक शाळा पळसंब येथे स्वातंत्र्यदिन मोठा उत्सहात साजरा
सकाळी शाळेचे मुख्याध्यापक विनोद कदमयांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी त्यांनी उपस्थितांना स्वातंत्रदिनाचे महत्व पटवून दिले. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रविकांत सावंत पळसंब उपसरपंच अविराज परब माजी सरपंच चंदकांत गोलतकर ,डॉ.स्वप्नील भोगटे डाॅ. स्वरा भोगटे, सुहास सावंत प्रमोद सावंत अमरेश पुजारे रमेश मुणगेकर मोहन आपकर अरुण माने राजन पुजारे शिक्षक शिक्षक . दर्शन हजारे,अंगणवाडी सेविका तसेच अन्य मान्यवर आदी उपस्थित होते. यावेळी ५ ऑगस्ट ७८ व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून पळसंब नं१ शाळेचे माजी विद्यार्थी डॉ.स्वप्नील भोगटे तसेच डाॅ. स्वरा भोगटे यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले.
यावेळी बोलताना*डॉ.स्वरा भोगटे यांनी शिक्षण हे तुमचे भविष्यातील करीयर घडवण्याची संधी आहे . शिक्षणाने अनेक नोकरी उद्योगाची दारे आपोआप उघडतील असे मत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दर्शन हजारे आभार श्रीमती सोनगडे मॅडम यांनी केले.या शाळेचे मुख्याध्यापक श्री कदम सर यांनी आदरणीय भोगटे उभयतांचे खूप खूप आभार मानले. याच कार्यक्रमात निपून भारत अभियान कार्यक्रम आयोजित करण्यात आला.या कार्यक्रमाची सविस्तर माहिती श्रीमती योगीता कदम मॅडम यांनी दिली.
आचरा, अर्जुन बापर्डेकर