७८ व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मूर्तिकार मारुती पालव यांच्या हस्ते गोपुरी आश्रमात ध्वजारोहण
राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आहेत पालव गुरुजी
७८ व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने गोपुरी आश्रमात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध मूर्तिकार तसेच शैक्षणिक क्षेत्रातील आदर्शवत उत्तुंग कामगिरी बद्दल राष्ट्रपती पारितोषिकाने सन्मानित आदरणीय मारुती पालव गुरुजी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पालव गुरुजी यांनी अप्पासाहेब पटवर्धन यांच्या तंत्रशुद्ध शेतीच्या प्रशिक्षणाचा त्यांच्या आजोबांना कसा लाभ झाला व आपले आजोबा कसे आदर्शवत शेतकरी झाले व त्यांचा महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते गौरव झाला याची आठवण सांगितली. आज माझ्या हस्ते गोपुरी आश्रमात ध्वजारोहण होत आहे याचा मला विशेष आनंद होत आहे असे पालव गुरुजी यांनी उद्गार काढले. त्यांची नात चित्रकार व मूर्तिकार राधिका पालव ही सुद्धा त्यांच्या समवेत उपस्थित होती.
ध्वजारोहण कार्यक्रमास गोपुरी श्रमाचे सचिव विनायक उर्फ बाळू मेस्त्री संचालिका अर्पिता मुंबरकर, सदस्य सदाशिव राणे, विनायक सापळे, गोपुरी आश्रामाचा मित्र परिवार प्रदीप मांजरेकर, कुलदीप कुडाळकर, मयुरेश तिर्लोटकर, मिलिंद पालव, सचिन सादये,आदेश कारेकर, सुरेश रासम, डॉ. प्रमोद घाडीगावकर, सहदेव पाटकर, कवी श्रेयस शिंदे, जावेद खान, राजाराम गावडे, प्रियांका मेस्त्री, नताशा हिंदळेकर,वृदाली हजारे तसेच गुरुप्रसाद तेंडुलकर, पुंडलिक कदम, लक्ष्मण परब, मनीषा गावडे, प्रकाश आरोलकर,भरत दिकवलकर आदी गोपुरीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
कणकवली, प्रतिनिधी