भिरवंडेत तलाठी समृद्धी गवस यांच्या हस्ते ध्वजारोहण
त्यांच्या कामाची दखल घेत केला गौरव
आपल्या भारत देशाच्या 78 व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने 15 ऑगस्ट रोजी भिरवंडे ग्रामपंचायत मध्ये ध्वजारोहणाचा मान गावच्या तलाठी कुमारी समृद्धी मनोहर गवस यांना देण्यात आला. सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत तलाठी समृद्धी गवस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
सिंधुदुर्गातील दोडामार्ग तालुक्यातील तेरवण मेढे गावच्या मूळच्या असलेल्या समृद्धी मनोहर गवस यांचे बालपण व शिक्षण मुंबईतच झाले. त्यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण मुंबई अंधेरी येथील राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे पूर्ण केले.त्यानंतर शासकीय सेवेत येण्याचे ठरविले.तलाठी पदाची परीक्षा उत्तीर्ण होत डिसेंबर 20१९ मध्ये त्या भिरवंडे गावच्या तलाठी म्हणून महसूल विभागाच्या सेवेत रुजू झाल्या. गेली पाच वर्ष त्या भिरवंडे तलाठी पदाच्या माध्यमातून पाच महसुली गावांमध्ये सेवा देत आहेत. सध्या त्यांच्याकडे नाटळ गावच्या तलाठी पदाची अतिरिक्त जबाबदारी आहे. महसूल विभागात कार्यरत असताना तलाठी म्हणून उत्तम कामगिरी त्या पार पाडत आहेत .त्याची दखल घेत भिरवंडे ग्रामपंचायत कडून स्वातंत्र्यदिना निमित्त ध्वजारोहणाचा मान तलाठी समृद्धी गवस यांना देण्यात आला. यावेळी सरपंच नितीन सावंत,तंटामुक्त समितीचे अध्यक्ष प्रकाश घाडीगावकर, ग्रामपंचायत सदस्य मिलिंद पवार, रश्मी सावंत, अंकिता सावंत, मुख्याध्यापक जगन्नाथ गावकर, सामाजिक कार्यकर्ते संदीप सावंत ,पोलीस पाटील बाळकृष्ण सावंत ,पोस्ट मास्तर केतकी बर्गे ,सामुदायक आरोग्य अधिकारी संस्कृति देशमुख, आरोग्य सेवक शीला कांबळे,आरोग्य सेवक हरिश्चंद्र जाधव, सीआरपी अमिता सावंत, अरविंद सावंत ,मंगेश सावंत, विशाल सावंत, शितल राणे आधी उपस्थित होते.
कणकवली, प्रतिनिधी