तिरंगा रॅलीने कलमठ झाले तिरंगामय
कलमठ ग्रामपंचायतच्यावतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त तिरंगा रॅलीचे आयोजन
लाडकी बहीण योजनेत चांगले काम केलेल्या अंगणवाडी सेविका ,मदतनीस, आशा सेविका यांचा सत्कार
शासनाच्या हरघर तिरंगा उपक्रमांतर्गत कलमठ गावातील ग्रामस्थ, विद्यार्थी लोकप्रतिनिधी मिळून आज कलमठ ग्रामपंचायत ते बाजारपेठ अशी तिरंगा रॅली काढण्यात आली. सदर रॅलीमध्ये कलमठ गावातील बहुसंख्या ग्रामस्थ लोकप्रतिनिधी व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग दर्शविला.
आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने कलमठ ग्रामपंचायत सभागृहाचे लोकार्पण देखील करण्यात आले. सकाळी ध्वजारोहणानंतर गावातून शालेय विद्यार्थ्यांनी विविध देशभक्तीपर नृत्य गीत गायन करून उपस्थित सर्वांची मने जिंकली.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये चांगले काम केल्याबद्दल कलमठ गावातील अंगणवाडी सेविका ,मदतनीस, आशा सेविका यांचा सत्कार करण्यात आला. तसंच नुकत्याच झालेल्या पोलीस भरतीमध्ये निवड झालेल्या गावातील साहिल अनिल मठकर याचा माजी सैनिक सत्यवान देसाई यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
त्यानंतर ग्रामपंचायत कलमठ ते बाजारपेठ पर्यंत तिरंगा रॅली काढण्यात आली. ढोल ताशे, देशभक्तीपर गीते, घोषणांनी वातावरण तिरांगमय झाले होते. या रॅलीमध्ये कलमठ वासियांनी उत्स्फूर्त पणे सहभाग दर्शविला.
यावेळी गावचे सरपंच संदीप मेस्त्री, उपसरपंच स्वप्निल चिंदरकर, ग्रामविकास अधिकारी प्रवीण कुडतरकर, माजी पंचायत समिती सदस्य महेश लाड, ग्रामपंचायत सदस्य नितीन पवार, पप्पू यादव, दिनेश गोठणकर, सुप्रिया मेस्त्री, अनुप वारंग , हेलन कांबळे, स्वाती नारकर, सचिन खोचरे, स्वाती नारकर, इफत शेख, प्रियाली आचरेकर, मुख्याध्यापक मधुरा सावंत, रश्मी आंगणे, श्रीकांत बुचडे,शिक्षक प्रमोद पवार, अमित हर्णे, इंदू डगरे, विद्या लोकरे, चित्राक्षी देसाई, रमेश डोईफोडे, ऋतुजा जाधव अनिल मेस्त्री, गिरीश धुमाळे, आबा कोरगावकर, मनोज घाडीगावकर, संदीप पवार, बाबू नारकर,समर्थ कोरगावकर, अमोल कोरगावकर ,कीर्ती मेस्त्री, श्रुती मोडक, नेहा वावळे उपस्थित होते.
कणकवली, प्रतिनिधि