पंडित जितेंद्र अभिषेकी सघनगान केंद्र आयोजित ‘गुरुपौर्णिमा १७ व १८ऑगस्ट रोजी
पंडीत हेमंत पेंडसे यांची विशेष उपस्थिती व गायन
वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान कणकवली आयोजित
वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान कणकवली संचालित पंडित जितेंद्र अभिषेकी सघनगान केंद्र आयोजित ‘गुरुपौर्णिमा’ २०२४ शनिवारी १७ ऑगस्ट व रविवारी १८ऑगस्ट ला साजरी होणार आहे. यानिमित्त पंडीत हेमंत पेंडसे यांची विशेष उपस्थिती आणि गायन होणार आहे. संस्थेच्या माध्यमातून पंडीत जितेंद्र अभिषेकी सघनगान केंद्राचे सहकार्याने यावर्षीची गुरुपौर्णिमा तीन सत्रात होणार आहे. शनिवार १७/०८/२०२४ रोजी प्रथम सत्रात सायंकाळी ५:३० ते ८:३० यामध्ये सघननाग केद्रांचे गुरु पंडित समीर दुबळे यांंच्या शिष्यांचे गायन आणि तबला प्रशिक्षण केंद्राचे गुरु चारूदत्त फडके यांचे शिष्य यांचे तबला वादन होणार आहे. त्यानंतर श्री चारुदत्त फडके यांचे एकल (सोलो) तबला वादनाने सदर सत्राची सांगता होणार आहे. रविवार १८/०८/२०२४ रोजी दुसरे सत्र सकाळी ९:३० ते दुपारी १२:३० वाजता सघनगान केंद्राचे विद्यार्थी आपले गायन व वादन सादर करतील तसेच शेवटचे सत्र सायंकाळी ५:३० वाजता सुरु होऊन या सत्रात ७:०० वाजेपर्यंत सर्व विद्यार्थी आपले गायन व वादन करुन गुरुवंदना देणार आहेत.
त्यानंतर गुरुपूजन होऊन त्यांनतर पंडीत जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य पंडीत हेमंत पेंडसे यांचे गायन होऊन त्यानंतर पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य व संघनगान केंद्रांचे गुरू पंडित समीर दुबळे यांच्या गायनाने या सोहळ्याची सांगता होणार आहे.
या सोहळ्यातील गायन मैफीलीला संवादिनीसाथ अदिती गराडे (पुणे), मंगेश मेस्त्री आणि तबलासाथ अभिजीत बारटक्के, ओंकार भोरडे (पुणे ) निरज भोसले यांची साथसंगत लाभणार आहे तरी या संगित सोहळ्यास सर्व रसिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेचे कार्याध्यक्ष ॲड.एन.आर.देसाई यांनी केले आहे.
कणकवली, प्रतिनिधी