ग्राहक पंचायतच्या राज्य अधिवेशनाला उपस्थित रहा!

जिल्हाध्यक्ष प्रा.सुरेश पाटील यांचे आवाहन

ग्राहक पंचायत महाराष्ट्र या संस्थेची कणकवली तालुका शाखा कार्यकारिणी व जिल्हा शाखा कार्यकारिणीची एकत्रित सभा रविवार दिनांक ११ ऑगस्ट २०२४ रोजी कणकवली येथील ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केन्द्र, नगरपंचायत कणकवली येथे जिल्हाध्यक्ष व राज्य सहसचिव प्रा.सुरेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.या सभेमध्ये ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य अधिवेशन (राज्य अभ्यासवर्ग ) दिनांक २४ व २५ ऑगस्ट रोजी कोल्हापूर येथे होणार असलेचे सांगण्यात येऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कोकण विभागातील जास्तीत जास्त सभासदांनी या अभ्यास वर्गाला उपस्थित राहावे, असे आवाहन प्रा. सुरेश पाटील यांनी केले. तसेच कणकवली तालुका शाखेचे काम उल्लेखनीय असल्याचे सांगून जिल्ह्यातील इतर तालुका शाखानी त्यांचा आदर्श घ्यावा. जिल्ह्यातील जास्तीत जास्त सजग ग्राहकांनी ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे सदस्यत्व स्वीकारावे, असे आवाहनही प्रा.पाटील यांनी केले.
सदर सभेला ग्राहक पंचायत महाराष्ट्र सिंधुदुर्गचे संघटक श्री सिताराम उर्फ दादा कुडतरकर, सचिव संदेश तुळसणकर, सहसंघटक श्री. प्रमोद मोहिते, सौ. मुग्धा मोहिते, जिल्हा महीला सहसंघटक सौ. रीमा भोसले, कणकवली तालुका अध्यक्ष सौ.श्रद्धा कदम, उपाध्यक्ष गीतांजली कामत, सचिव सौ. पूजा सावंत, सहसचिव श्री. विनायक पाताडे, संघटक श्री.जनार्दन शेळके,संघटक श्री. राजन भोसले, सल्लागार श्री. मनोहर पाल्येकर, सदस्य सौ. सुगंधा देवरुखकर,सदस्य श्री.चंद्रकांत चव्हाण, इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!