कणकवलीत अखंड हरिनाम सप्ताहास उत्साहात प्रारंभ

भजने,चित्ररथ व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन
रविवारी कणकवली शहरातून नगर प्रदक्षिणेने होणार सांगता…!
श्री देव काशीविश्वेश्वर मंदिरात श्रावण महिन्यातील अखंड हरिनाम सप्ताहाला रविवारी दुपारी मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात प्रारंभ झाला.सप्ताह सुरवातीस घटस्थापना करून. ब्रम्हवृदाच्या हस्ते विधिवत पूजा, गाऱ्हाणे करून तसेच विठ्ठल नामाच्या अभंगांनी व टाळघोषात भाविकांनी रिंगण करत प्रारंभ केला. या सप्ताह निमित्त मंदिरात पारंपारिक पद्धतीत कणस, आंब्याचे टाळ,केळ्याचे घड तसेच केळ्याच्या मोण्यांनी सजवण्यात आले आहे.या मंदिर परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली असून काशीविश्वेश्वर देवस्थानच्या वतीने सप्ताहाचे नीटनेटके नियोजन करण्यात आले आहे.
याप्रसंगी विविध पारांचे प्रमुख ,मानकरी तसेच भाविक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पहिल्या दिवशी हनुमान मित्रमंडळ मारुती आळी यांनी जागवला यानंतरचे हरिनाम सप्ताहाचे दिन वितरण पुढील प्रमाणे, दुसरा दिवस सोमवार पटकीदेवी मित्रमंडळ, तिसरा दिवस मंगळावर तेलीआळी मित्रमंडळ, चौथा दिवस बुधवार महापुरुष मित्रमंडळ, पाचवा दिवस गुरुवार बिजलीनगर मित्रमंडळ, सहावा दिवस शुक्रवार आंबेआळी मित्रमंडळ, सातवा दिवस शनिवार ढालकाठी मित्रमंडळ
तर रविवारी कणकवली शहरात नगरप्रदक्षणा व दुपारी महाप्रसादाने हरिनाम सप्तांहाची सांगता होणार आहे.सतत सात दिवसाच्या कालावधीत मंदिरात रात्री चित्ररथ दिंडी व भरगच्च भजनाचे कार्यक्रम होणार असून शहरात भक्तिमय वातावरण तयार झाले आहे. या हरिनाम सप्तांहाचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन.श्री देव काशीविश्वेश्वर देवस्थान कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.
कणकवली, प्रतिनिधी





