वेदांता प्रशिक्षण केंद्रातून ४७ महिलांना प्रशिक्षण
पहिली बॅच ; मान्यवरांच्या हस्ते वझरेत प्रमाणपत्रांचे वितरण
वझरे गावठणवाडी येथील वेदांता टेलरिंग प्रशिक्षण केंद्रातून पदवी प्राप्त केलेल्या पहिल्या बॅचसाठी प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाशी (एनएसडीसी) संलग्न असलेला तीन महिन्यांचा टेलरिंग अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या ४७ महिलांचा या समारंभात गौरव करण्यात आला. वझरे येथील सेसा कोक या वेदांता सेसा गोवाच्या धोरणात्मक व्यवसाय युनिटकडून हे वेदांता टेलरिंग प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात आले आहे. वेदांता फाउंडेशनच्या नेतृत्वाखाली कंपनीने स्थापन केलेल्या, या प्रशिक्षण केंद्राचे उद्दिष्ट, स्थानिक समुदायातील महिलांना त्यांच्या रोजगार क्षमतेत लक्षणीय सुधारणा करण्यासाठी टेलरिंगचे आवश्यक प्रशिक्षण आणि कौशल्य देऊन सुसज्ज करणे हे आहे.
प्रमाणपत्र वितरण समारंभ वझरेतील तेजस्विनी ग्राम संघाच्या सदस्या दोडामार्ग तालुका पत्रकार समितीचे अध्यक्ष संदीप देसाई तसेच कंपनीचेअधिकारी, वेदांता सेसा गोवाच्या सीएसआर प्रमुख लीना वेरेकर, उपप्रमुख नीलेश ढोरे, सेसा कोकचे मुख्य वित्त अधिकारी श्रेयस नागर, सेसा कोक वझरेचे प्रमुख प्रणय वालावलीकर, लीड सीएसआर इआर – पीआर, वैभवी कुलकर्णी आणि वेदांता फाउंडेशनचे समन्वयक, दिनेश दवंडे यावेळी उपस्थित होते. वेदांता सेसा गोवाचे सीईओ नवीन जाजू म्हणाले की, वेदांता टेलरिंग ट्रेनिंग सेंटर मधून पहिली बॅच यशस्वी होणे हे महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. वेदांतामध्ये, आम्ही रोजगार निर्मितीचेमाध्यम म्हणून कौशल्यावर लक्ष केंद्रित करतो. अशाच ५ व्हीटीटीसीद्वारेआम्ही २५० हून अधिक महिलांना आर्थिक सक्षम केले आहे.
प्रतिनिधी, दोडामार्ग