क्रांती दिनानिमित्त पिरावाडी येथे हुतात्मा कोयंडे यांना मानवंदना

ग्रामोन्नती मंडळाचा पुढाकार
आचरा-अर्जुन बापर्डेकर
क्रातीदिनाचे औचित्य साधून आचरा पिरावाडी ता.मालवण येथे हुतात्मा दत्ताराम भाऊ कोयंडे याचे घरी पिरावाडी येथे त्याच्या प्रतिमेला व प्रा.शाळा पिरावाडी येथील पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन ग्रामोन्नती मंडळ पिरावाडी कडून मानवंदना देण्यात आली .यावेळी मंडळाचे अध्यक्ष नारायण कुबल उपाध्यक्ष मंदार खोबरेकर डाँ प्रमोद कोळबकर विजय जोशी परेश तारी विठ्ठल धुरी वैभव कुमठेकर जय कुबल देवेन्द्र वाडेकर बाळा हुर्णेकर पो.पाटील जगंनाथ जोशी आदिसह पिरावाडी ग्रामस्थ उपस्थित होते*
*यावेळी अमर रहे अमर रहे हुतात्मा दत्ताराम भाऊ कोयंडे अमर रहे ..भारत माता की जय ..वंदे मातरम्.अशा घोषणामुळे वातावरण देशभक्ती मय झाले होते . या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जय कुबल तर नियोजन ग्रामोन्नती मंडळ आचरा पिरावाडी कडून करण्यात आले होते.





