पिंगुळी व्यापारी बांधवांमार्फत अनोखी होळी

कुडाळ : पिंगुळी गावात ठिकठिकाणी होळी साजरी करत असतानाच पिंगुळी म्हापसेकर तिठा येथे व्यापारी बांधवामार्फत कचरा गोळा करून त्याचे दहन करण्यात आले आणि एक अनोखी होळी साजरी करण्यात आली. यावेळी नारळ ठेऊन गावात कचरा टाकणाऱ्या व्यक्तींना कचरा टाकल्याने आपण करत असलेल्या गावाच्या हानीबाबत जाणीव करून दे आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकता त्याची विल्हेवाट लावण्याची बुद्धी दे अशी प्रार्थना करण्यात आली. यावेळीं व्यापारी संघटना अध्यक्ष सुनील म्हापसेकर, उपाध्यक्ष दीपक गावडे, तंटामुक्ती अध्यक्ष राघोबा धुरी, भूषण तेजम, सतिश माडये, साईराज जाधव, पंकज गावडे आदी उपस्थित होते.
रोहन नाईक, कोकण नाऊ, कुडाळ






