ज्ञानदा शिक्षण संस्था संचलित आयडियल इंग्लिश स्कूल वरवडे ची विद्यार्थिनी कु.हर्षिता अजित सावंत हीचे जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेत यश

कणकवली/मयूर ठाकूर

सिंधुदुर्ग जिल्हा योगासन स्पोर्ट्स आयोजित जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेत ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडे प्रशालेच्या कु. हर्षिता अजित सावंत हिने 14 ते 18 वर्षे वयोगटात ट्रॅडिशनल योग या प्रकारात जिल्हा दुसरा क्रमांक पटकावला आहे. तसेच तिची अहमदनगर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या यशाबद्दल ज्ञानदा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. विद्याधर तायशेटे ,सचिव प्राध्यापक हरिभाऊ भिसे सर,कार्याध्यक्ष श्री. बुलंद पटेल, सहसचिव प्राध्यापक निलेश महिंद्रकर सर ,खजिनदार सौ शितल सावंत मॅडम सल्लागार डी.पी तानवडे सर मुख्याध्यापिका सौ.अर्चना शेखर देसाई मॅडम ,शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी अभिनंदन केले आहे

error: Content is protected !!