तळेखोल येथून आरोग्य सेवेचा प्रारंभ

डी. एस्. व्ही. फाउंडेशनचा उपक्रम


✅प्रतिनिधी l दोडामार्ग
डी. एस्. व्ही. फाउंडेशनच्या मोबाईल हेल्थ केअर उपक्रमाचा प्रारंभ आज (ता. ३) तळेखोल येथून करण्यात आला.
यावेळी डिव्हीएस् फाउंडेशनचे आंतरराष्ट्रीय व्यवस्थापक समिर खत्री व राष्ट्रीय व्यवस्थापक अब्राहम जेकब यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून तालुक्यातील कार्यकमाची सुरुवात करण्यात आली . प्रकल्प व्यवस्थापक विकास कुलकर्णी व ग्रामस्थांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र ठाकूर यांनी या भागातील आरोग्याच्या समस्यांबांबत मान्यवरांना अवगत केले. त्यानंतर श्री. खत्री यांनी हा प्रकल्प पाच वर्षे चालणार असून पूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले. यावेळी व्हॉलेंटरी हेल्थ असोशियनचे माजी अध्यक्ष राज वैद्य, मनोज वझे यांनी आपले विचार मांडले, यावेळी डॉ. एस. पी. कामत तळेखोल सरपंच श्रीमती सावंत, वझरे सरपंच सुरेश गवस, विर्डी उपसरपंच एकनाथ गवस, चंद्रकांत गवस, डॉ. रामदास रेडकर आदी उपस्थित होते. .सूत्रसंचालन समिर साखळकर यानी केले. रामकृष्ण दळवी यांनी आभार मानले.
एक डॉक्टर,एक नर्स व प्राथमिक वैद्यकीय उपकरणांनी सज्ज असलेली मोबाईल व्हॅन (बस) दोडामार्गवासियांच्या सेवेत आजपासून रुजू झाली आहे.
पहिल्या टप्प्यात आयी , माटणे, आंबडगाव, गिरोडे, वझरे, तळेखोल व विर्डी या सात गावात संस्थेचे काम चालणार आहे. प्रत्येक गावात एक दिवस आरोग्य सेवा देणारे हे वाहन नेले जाणार आहे.
दरम्यान, तळेखोल येथे आज पहिल्या दिवशी समूह आरोग्य तपासणी,रक्त तपासणी,नेत्रचिकित्सा व स्त्री रोग चिकित्सा आदी सेवा पुरविण्यात आल्या. पहिल्याच दिवशी लोकांचा उत्फुर्त प्रतिसाद लाभला यावेळी सुमारे नव्वद रुग्णांनी सेवेचा लाभ घेतला.यावेळी औषधोपचारही पुरवण्यात आले.

error: Content is protected !!