भाजपा युवा मोर्चाने दिली मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना शिबिराला भेट

कणकवली तहसील कार्यालयात करण्यात आले होते शिबिराचे आयोजन

राज्य सरकारच्या वतीने राज्यभर राबविण्यात आलेल्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणच्या कणकवली तहसील कार्यालयातील शिबिराला आज भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, सरचिटणीस संतोष पुजारे, चिटणीस गणेश तळगावकर, शहराध्यक्ष सागर राणे यांनी भेट देऊन माहिती घेतली कौशल्य विकास अधिकारी सूरज देबाजे ,औद्योगिक प्रशिक्षण संस्था फोंडाघाटचे निर्देशक सतीश मेस्त्री यांची शिबिराच्या ठिकाणी भेट घेऊन योजने विषयी माहिती घेत चर्चा केली. या शिबिरात तालुक्यातील ४५ तरुण तरुणींनी सहभाग दर्शविला.
यावेळी ओमकार वावळे, रजत कदम उपस्थित होते.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!