शिवसेना ठाकरे गटाची महत्वाची बैठक 22 जुलै रोजी

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख पदाधिकारी राहणार उपस्थित
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कणकवली विजय भवन येथे कणकवली तालुक्याची बैठक सोमवार दिनांक २२ रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली आहे. या बैठिकाला शिवसेना नेते माजी खाजदार विनायक राऊत, शिवसेना उपनेते गौरीशंकर खोत, जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दूधवडकर, आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, विधानसभा प्रमुख सतीश सावंत, संपर्क प्रमुख अतुल रावराणे, महिला जिल्हा प्रमुख नीलम पालव, जिल्हा युवा सेना प्रमुख सुशांत नाईक उपस्थित राहणार आहेत. तरी तालुक्यातील सर्व पदाधिकारी, शाखाप्रमुख, सरपंच महिला पदाधिकारी, युवा सेना पदाधिकारी यांनी वेळेतेच उपस्थित राहावे असे आवाहन तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत व कन्हैया पारकर यांनी केले आहे.
कणकवली प्रतिनिधी