मसुरे येथे साने गुरुजी कथामालेचा शुभारंभ

आचरा–अर्जुन बापर्डेकर
आर पी बागवे स्कूल मसुरे येथे साने गुरुजी कथामालेचा शुभारंभ करण्यात आला .इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना घेऊन आनंददायी शनिवार या उपक्रमांतर्गत साने गुरुजी कथामालेतर्फे साने गुरुजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सुरू करण्यात आली. सुरुवात खरा तो एकची धर्म या प्रार्थनेने झाली.यानंतर कथा मालेचा उद्देश ,आनंददायी शनिवार मध्ये अभ्यास न करणाऱ्या, अपुरा ठेवणाऱ्या विद्यार्थ्यांना सहभाग कसा घेता येणार नाही याची माहिती मुख्याध्यापिका गोदे मॅडम यांनी दिली. त्यानंतर विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. कोदे मॅडम यांनी आदर्श कथाकथनाचा नमुना कसा असावा याचे प्रात्यक्षिक करून दाखवत बाताराम थापमारे आणिथापाराम थांबरे ही गोष्ट पेश केली. त्यानंतर विद्यार्थ्यांना मुक्तपणे पेटी वादन करण्यास ,शिकण्यास वेळ दिला गेला . एक देशभक्ती पर कन्नड गीत शिकवून व पसायदान म्हणून कार्यक्रमाचे सांगता करण्यात आली. यावेळी श्री. पाताडेसर, सौ. भोगले, कु. जाधव मॅडम व विद्यार्थी उपस्थित होते.

error: Content is protected !!