विद्यामंदिर इंग्लिश मिडीयम स्कूल चा बांधावरची शेती, श्रमाचे महत्व उपक्रम

विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी घेतला शेतीमध्ये सहभाग
विद्यामंदिर इंग्लिश मिडीयम स्कूल ही कणकवली शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेली शाळा आपल्या नाविण्यपूर्ण उपक्रमाने दर्जेदार आहे . सर्वसामान्य कुंटुंबातील मुलामुलींना इंग्रजी माध्यमातून शिक्षणाची सोय उपलब्ध व्हावी आणि प्रगत जगात आपले स्थान बळकट व्हावे याच उद्देशाने सर्वसामान्य पालकांना परवडेल अशा मापक फीमध्ये उच्चदर्जाचे सर्व सोयीनीयुक्त असलेली इंग्लिश माध्यमाची शाळा शिक्षण प्रसारक मंडळाने एक आदर्श शाळा उपलब्ध करून दिलेली आहे . इंग्रजी माध्यमाची शाळा असूनही भारतीय कृषी संस्कृतीचे शिक्षण विद्यार्थांना मिळालेले पाहिजे याच उद्देशाने मुख्याध्यापिका दिव्या सावंत मॅडम व सहकारी शिक्षकांनी नाविण्यपूर्ण उपक्रम म्हणून आजच्या नव्या पिढीला शेती आणि अवजारे शेतीतील पिकांची लावणी भाताची शेती कशी कसायची लावणीसाठी लागणारा चिखल भाताचे तरु (तरवा ) कसा उपटावा , त्याची पेंढी कशी बांधांवी यांची शिकवण श्री सावंत सर यांनी विद्यार्थ्याना कृतीतून दिली . . सर्वच विद्यार्थ्यांना शेती संस्कृतीची शिकवण मिळाली तसेच श्रमप्रतिष्ठा या मूल्याची नव्याने जाणीव करून दिली . विद्यामंदिर इंग्लिश मिडीयम स्कूलच्या या उपक्रमाला मुख्याध्यापक श्री पी जे कांबळे सर पर्यवेक्षक सौ जाधव मॅडम जेष्ठ शिक्षक श्री अच्युतराव वणवे सर तसेच शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा . श्री . तवटे साहेब चेअरमन डॉ सौ साळुंखे मॅडम सचिव मा. श्री .वळजूं साहेब यांनी शुभेच्छा दिल्या .
कणकवली प्रतिनिधी