कणकवली तहसीलदार देशपांडे यांनी केली खारेपाटण येथील पुरस्थिती नुकसानग्रस्त भागाची पाहणी

नुकसान ग्रस्त लोकांशी संवाद साधत जाणून घेतल्या समस्या

खारेपाटण येथे काल मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले. शुक नदीने धोक्याची पातळी ओलांडून खारेपाटण येथे पुरस्थिती निर्माण झाली होती. अनेक रस्ते पाण्याखाली गेले होते.पुराचे पाणी काही लोकांच्या घरात देखील घुसले होते. यामुळे लोकांचे नुकसान झाले. खारेपाटण मच्छिमार्केट मध्ये सुद्धा पुराचे पाणी घुसल्याने येथील चिकन विक्रेत्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.जैन बस्ती तील लोकांच्या घरात पाणी गेल्याने त्यांचे ही नुकसान झाले आहे.कणकवली तहसीलदार यांनी काल रात्री उशिरापर्यंत खारेपाटण मध्ये स्वतः उपस्थित राहून पुरस्थिती ची पाहणी करून लोकांना दिलासा दिला होता. आज पुन्हा तत्परतेने खारेपाटण येथे येऊन तहसीलदार देशपांडे यांनी नुकसान ग्रस्त भागाची पाहणी केली. मच्छि मार्केट मध्ये जाऊन येथील नुकसान ग्रस्त विक्रेत्यांशी संवाद साधला त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. शिवाय जैन बस्तीत जाऊन तेथील नुकसान ग्रस्त लोकांच्या समस्या जाणून घेतल्या व नुकसान झालेल्या घराची पाहणी केली.नुकसान ग्रस्त लोकांना मदतीचा दिलासा दिला. यावेळी मा.जि प सदस्य बाळा जठार,खारेपाटण सरपंच प्राची इस्वलकर, उपसरपंच महेंद्र गुरव, तलाठी -जैनवार ग्रा.प सदस्य जयदीप देसाई, किरण करले, बूथ कमिटी शेखर शिंदे ग्रामपंचायत कर्मचारी व अनिकेत गुरव आदि उपस्थित होते.

error: Content is protected !!