विज चोरी प्रकरणी लोरे नंबर 1 मधील दोघांवर गुन्हा दाखल

महावितरणच्या उपकार्यकारी अभियंता यांनी दिली पोलिसात फिर्याद
3 हजार 240 युनिटची केली वीज चोरी
कणकवली विभागाचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते यांच्या आदेशानुसार कणकवली तालुक्यातील लोरी नंबर 1 येथे मीटर तपासणी करण्याकरता गेलेल्या वीज वितरण च्या अधिकाऱ्यांनी वीज चोरी उघडकीस आली. घराच्या मागील बाजूस असलेल्या झाडांना पंपाद्वारे पाणी देण्याचे काम सुरू असताना वीज अधिकाऱ्यांचे पथक तेथे गेले असता तेथील एसमो नावाच्या खाणीच्या पाणवठ्यावर 1 एचपी चा पंप बसवून पाणी देण्याचे काम सुरू होते. या पंपाला तेथे असलेल्या थ्री फेज मीटरच्या इनकमिंग मधून अनधिकृत रित्या कनेक्शन घेण्यात आल्या ची तक्रार उपकार्यकारी अभियंता विलास बगडे यांनी कणकवली पोलिसात दिली आहे. या तक्रारीनुसार पोलिसांनी तेथील लोरे 1 येथील विश्राम आत्माराम राणे व वैशाली विश्राम राणे यांच्यावर भारतीय विद्युत अधिनियम सुधारणा 2003 च्या कलम 135 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने लोरे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत श्री बगडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते यांच्या मौखिक आदेशानुसार 16 एप्रिल 2024 रोजी लोरे नंबर 1 येथे गेले असता विश्राम आत्माराम राणे यांच्या घराचा मीटर चेक केला. त्यावेळी सदर मीटर बंद स्थितीत आढळून आला. त्यांच्या घराच्या पाठीमागील बाजूस या वीज अधिकाऱ्यांचे पथक गेले असता पाठीमागील बाजूस छोटीशी शेती आढळून आली. व त्याला तेथील एसमो कंपनीच्या खाणीच्या असलेल्या पाणवठ्यावर 1 एचपीच्या पंपाद्वारे पाणी देण्याचे काम सुरू असल्याचे बाब श्री बगडे व पथकाच्या निदर्शनास आली. या पथकामध्ये श्री बगडे यांच्यासोबत सहाय्यक अभियंता प्रकल्प यळगुळकर, सहाय्यक अभियंता नितीन कांबळे होते. यांनी त्या ठिकाणी तपासणी केली असता तेथे असलेल्या ट्रान्सफॉर्मरच्या बाजूच्या थ्री फेज मीटर च्या इनकमिंगला सर्विस वायर द्वारे जोडून पंपाला विद्युत पुरवठा करण्यात आला होता. व पपं ला स्टार्टर द्वारे नियंत्रित केला जात असल्याची बाब निदर्शनास आली. यावेळी संबंधित विश्राम आत्माराम राणे यांच्या ही बाब निदर्शनास आणली. त्यावेळी त्यांनी देखील ही वीज चोरी केल्याचे या पथकासमोर मान्य केल्याचे या फिर्यादित बगडे यांनी म्हटले आहे. विश्राम राणे यांनी एप्रिल ते मे या कालावधीत 3240 एवढ्या वीज युनिटचे 1 मे 2023 ते 16 एप्रिल 2024 या कालावधीत शेती ग्राहक या टेरीफ नुसार दंडनीय रक्कम 29 हजार 20 व तडजोडीची रक्कम 1000 मिळवून एकूण रक्कम 30 हजार 20 असे बिल त्यांना देण्यात आले. मात्र ते बिल त्यांनी स्वीकारले नाही. व हे बिल आम्ही भरणार देखील नाही असे त्यांनी सांगितले. त्यामुळे विश्राम आत्माराम राणे (57) व वैशाली विश्राम राणे (52) यांच्या विरोधात ही फिर्याद कणकवली पोलिसात दाखल करण्यात आली आहे. शुक्रवारी 5 जुलै रोजी रात्री उशिरा ही फिर्याद दाखल करण्यात आली असून या दोन्ही संशयीतांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
कणकवली /प्रतिनिधी