त्रिंबक ग्रामपंचायत तर्फे सोमवारी १५रोजी वृक्षारोपण महोत्सव

आचरा–अर्जुन बापर्डेकर
ग्रामपंचायत त्रिंबक आणि जागृती त्रिंबक ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दिनांक १५ जुलै रोजी सकाळी ठीक १०.३० वाजता ग्रामपंचायत परीसरात वृक्षारोपण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी मालवण तहसीलदार वर्षा झाल्टे, गटविकास अधिकारी आत्मज मोरे, तालुका कृषी अधिकारी एकनाथ गुरव आदी उपस्थित राहणार आहेत.तरी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन त्रिंबक सरपंच किशोर त्रिंबककर, उपसरपंच आशिष बागवे यांनी केले आहे

error: Content is protected !!