विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्याचे काम शालेय शिक्षणमंत्री व त्यांचे खात करत आहे- माजी खासदार विनायक राऊत

ज्या शाळेमध्ये शिक्षणमंत्र्यांचे शिक्षण झाले आणि जी शाळा शिक्षण मंत्र्यांच्या घराच्या बाजूलाच आहे, ती जिल्हा परिषदेची शाळा कोसळते त्या शाळेला आज कुलूप लावले जाते, ही गोष्ट खरोखर दुर्देवी आहे. शिक्षणमंत्र्यांचे खाते विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळतेय. या विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे काम शिक्षणमंत्र्यांच्या खात्याने केल आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित व्हावे लागते ही गोष्ट शिक्षण मंत्र्यांना भूषणावत नाही. अशी प्रतिक्रिया माजी खासदार विनायक राऊत यांनी आज सावंतवाडी येथे केली. माजी खासदार विनायक राऊत आज सावंतवाडी तालुका दौऱ्यावर आले असताना त्यांनी सावंतवाडी शहरातील शाळा नंबर एकच्या कोसळलेल्या भागाची पहाणी केली. यावेळी ते म्हणाले, सिंधुदुर्गातील किमान 22 शाळा जीर्ण अवस्थेत आहेत. त्या कधीही कोसळू शकतात. तरी देखील त्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना बसविले जाते. शिक्षण खात्याची हि लापरवाही महाराष्ट्राला शोभा देणारी नाही. विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्याचे काम शालेय शिक्षणमंत्री व त्यांचे खात करत आहे. असा आरोप माजी खासदार विनायक राऊत यांनी केला. यावेळी उबाठा शिवसेना संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, उपजिल्हा प्रमुख बाबुराव धुरी, तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, बाळा गावडे, मायकल डिसोजा, जान्हवी सावंत, शब्बीर मणियार, चंद्रकांत कासार, शैलैश गवंडळकर, अजित सांगेलकर, कौस्तुभ गावडे आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.