मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी भाजप तर्फे आयोजित शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद

आचरा–अर्जुन बापर्डेकर
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी आवश्यक त्या कागदप्रत्रांचीची पुर्तता करुन परीपुर्ण प्रस्ताव सादर करण्यासाठी भारतीय जनता पार्टी आचरा विभागा तर्फे आयोजितविशेष शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
आचरा गावात ग्रामपंचायत आचरा गाऊडवाडी आणि आचरा तिठा वरचीवाडी अशा दोन ठिकाणी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी मोफत झेरॉक्स सुविधाही उपलब्ध करुन देण्यात आली होती. या शिबिराला महिलांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. आचरा तिठा येथील शिबीर यशस्वीतेसाठी सरपंच जेरोन फर्नांडिस, उपसरपंच संतोष मिराशी,जयप्रकाश परुळेकर, ग्रामपंचायत सदस्य पंकज आचरेकर, तसेच मनोज हडकर, महेश मेस्त्री, रुपेश परब जेष्ठ नागरिक संघाचे अशोक कांबळी, लक्ष्मण आचरेकर, लक्ष्मण बापर्डेकर, सुगंधा गुरव, मनाली फाटक आदींनी विशेष प्रयत्न केले
तर ग्रामपंचायत येथे भाजपचे राजन गांवकर, ग्रामपंचायत सदस्य चावल मुजावर, माजी उपसरपंच पाडूरंग वायंगणकर,जेष्ठ नागरिक संघाचे सुरेश गावकर, जेएम फर्नांडिस, शेट्ये, पोलीस पाटील जगन्नाथ जोशी आदींनी विशेष मेहनत घेतली..दोन दिवस चालणारया या शिबीराचा लाभ घेण्याचे आवाहन सरपंच जेरोन फर्नांडिस,भाजप आचरा प्रभारी राजन गांवकर यांनी केले आहे

error: Content is protected !!