हुतात्मा दत्ताराम भाऊ कोयंडे शाळेची कु. नीरजा महेंद्र वारंग ठरली शिष्यवृत्ती धारक

आचरा-अर्जुन बापर्डेकर
महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद पूणे यांनी घेतलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत हुतात्मा दत्ताराम भाऊ कोयंडे शाळेच्या कु. नीरजा महेंद्र वारंग हीने गुणवत्ता यादीत स्थान मिळविले आहे. ती तालुक्यात दुसरी आली आहे. या शिवाय या परीक्षेत ऊर्वी विनोद आचरेकर व कैवल्य प्रफुल्ल नलावडे हे पात्र ठरले आहेत .
याच शैक्षणिक वर्षात या शाळेतील कु. ऊर्वी विनोद आचरेकर हिची नवोदय विद्यालयासाठी निवड झाली आहे. तसेच इतर स्पर्धा परीक्षांमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. शिष्यवृत्ती परीकंषेत शाळेने मिळविलेल्या या उल्लेखनिय यशाबद्दल गुणवत्ताधारक विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष , उपाध्यक्ष व पालक यांचे कडून अभिनंदन होत आहे.

error: Content is protected !!