लक्ष्मी सीताराम शिरकर यांचे निधन

देवगड : देवगड तालुक्यातील मूळ वाडा चांभारघाटी येथील सध्या रा. कांदिवली भांब्रेकर नगर येथील रहिवासी श्रीमती लक्ष्मी सीताराम शिरकर ( वय 82 ) यांचे मुंबई कांदिवली येथे 3 जुलै रोजी रात्री 11 वाजता वृद्धत्वाने निधन झाले. त्यांच्या मृतदेहावर कांदिवली येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मुंबईस्थित प्रकाश शिरकर-वाडेकर व श्रीकांत शिरकर- वाडेकर यांच्या त्या आई होत. त्यांच्या पश्चत दोन मुलगे, विवाहित मुलगी, दोन सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
कणकवली प्रतिनिधी