जनतेची सेवा करण्याची संधी मला द्या–भाजप नेते निलेश राणेसंवाद बैठकांचा आचरा येथून शुभारंभ

आचरा–अर्जुन बापर्डेकर
जीव झोकून देणारे कार्यकर्ते राणे साहेबाच्या नेतृत्वाखाली तयार झाले याचा आम्हाला गर्व आहे.तुमच्या मेहनतीमुळेच सर्व निवडणूका आपण जिंकू शकलो.आता येणारया विधानसभा निवडणुकीत निलेश राणेंना जिंकून आणायचे की नाही हे तुम्हीच ठरवायचे आहे. तुमच्या सहकार्यावरच जनतेची सेवा करण्याची संधी मला द्या असे आवाहन भाजप नेते निलेश राणे यांनी आचरा येथे केले.आचरा ग्रामपंचायत, लोकसभा, पदवीधर निवडणूकीतील विजयाच्या पार्श्वभूमीवर भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांचे आभार मानावेत,त्यांच्याशी संवाद साधावा त्यांच्या अडीअडचणी जाणून घ्याव्यात या उद्देशाने भाजप नेते निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली मालवण तालुक्यात संवाद बैठकांचे आयोजन करण्यात आले आहेत.याचा शुभारंभ आचरा येथून करण्यात आला. यावेळी त्यांच्या सोबत भाजप जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, मालवण भाजप तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब,महेश मांजरेकर, मालवण तालुका खरेदी विक्री संघ अध्यक्ष राजन गांवकर ,आचरा सरपंच जेरोन फर्नांडिस, निलिमा सावंत ,आचरा सोसायटी चेअरमन अवधूत हळदणकर, उपसरपंच संतोष मिराशी,जयप्रकाश परुळेकर,चावल मुजावर, अभय भोसले,निलेश सरजोशी,संतोष गांवकर,दत्ता वराडकर यांसह ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी संचालक, बुथ अध्यक्ष आदींसह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना निलेश राणे यांनी मागील दहा वर्षात बरेच काही शिकता आले.विधानपरिषदेसाठी विचारणा झाली. पण कुणा दुसरयाचा अधिकार आपल्याला नको म्हणून नकार दिला. निवडून जणतेतूनच येणार. जिथे राणेसाहेबांचा पराभव झाला तिथूनच निलेश राणे निवडून येणार असा निर्धार व्यक्त केला.
यावेळी ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवलेल्या शाहिन काझी यांनी निलेश राणे यांच्या उपस्थितीत भाजप मध्ये प्रवेश केला. यावेळी धोंडू चिंदरकर
महेश मांजरेकर यांनीही मार्गदर्शन केले.