बाळू माने मित्रमंडळाच्या वतीने सावंतवाडीतील मुलीला उपचारासाठी आर्थिक मदत

शेख कुटुंबीयांकडून मानले मित्र मंडळाचे आभार
बाळू माने सिंधुदुर्ग मित्रमंडळ यांच्या सर्वांच्या माध्यमातून सावंतवाडी तालुक्यातील आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या शेख कुटुंबातील 10 वर्षाची मुलगी नेहरून शेख हि में महिन्यापासून गंभीर आजाराशी झुंज देत आहे.
याची दखल घेऊन या मित्र मंडळांनी प्रत्येकाने आपल्या परिस्थिती प्रमाणे वर्गणी काढून नेहरून हिचे प्राण वाचवण्यासाठी हात भार लावून रोख रक्कम रुपये शेख कुटुंबियाना बांबुळी हॉस्पिटलमध्ये सर्व मित्र मंडळींच्या वतीने सुपूर्त केली. याबद्दल या कुटुंबीयांच्या वतीने या मित्र मंडळाचे मनापासून आभार मानले.
कणकवली प्रतिनिधी