जानवली येथील चेतन लक्ष्मण प्रभू यांना कृषिरत्न पुरस्कार जाहीर

दैनिक रोखठोक व्हिजन कडून पुरस्कार करण्यात आला जाहीर
चेतन प्रभू यांचे सर्व स्तरातून केले जाते अभिनंदन
कर्तृत्ववान व्यक्तींना राष्ट्रीय पुरस्कार 2024 याकरिता जानवली येथील सामाजिक क्षेत्रात विशेष काम करणाऱ्या चेतन लक्ष्मण प्रभू यांना कृषिरत्न पुरस्कार 2024 जाहीर करण्यात आला आहे. त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल हा पुरस्कार दैनिक रोखठोक व्हिजन कडून जाहीर करण्यात आला आहे. रविवार 14 जुलै रोजी शाहू स्मारक भवन दसरा चौक कोल्हापूर या ठिकाणी या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. दैनिकाचे कार्यकारी संपादक डॉ. सुरेश राठोड व संपादक सुरेश वाडकर यांनी या पुरस्कार निवडीचे पत्र श्री प्रभू यांना दिले आहे. प्रभू यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन केले जात आहे. चेतन प्रभू हे कृषी विषयक मार्गदर्शक असून, माती परीक्षण मधील तज्ञ आहेत. तसेच शास्त्रीय पद्धतीने शेती मधीलही त्यांचा चांगला अभ्यास आहे.
दिगंबर वालावलकर/ कणकवली
आमची लाडकी पाळीव कुत्री “झेना” (पॉमेरियन जात) दिनांक 7 फेब्रुवारीच्या रात्रीपासून हरवली आहे. ती आमच्या कुटुंबाचा एक भाग आहे.
🐶 नाव: झेना
🐾 जात: पॉमेरियन
🎨 रंग: तांबूस/तांबड्या रंगाचे केस
📏 उंची: सुमारे 1 फूट
🎂 वय: 2 वर्षे
ती कोणाला दिसल्यास, सापडल्यास किंवा तिच्याबद्दल कोणतीही माहिती मिळाल्यास कृपया त्वरित संपर्क साधावा.
झेनाला सुरक्षित परत आणून देणाऱ्यास योग्य बक्षीस दिले जाईल.
📍 पत्ता: धुरीवाडा, मालवण
(तोंडवळकरांच्या चक्कीच्या बाजूचे घर)
📞 संपर्क: 7506829118
— कौस्तुभ चंद्रकांत फोंडबा
🙏 कृपया ही पोस्ट जास्तीत जास्त शेअर करा. तुमची एक शेअर आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. धन्यवाद.





