मालवण तालुक्यातील सर्व VLE म्हणजेच महा ई सेवा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र, सी एस सी केंद्र, ग्रामपंचायतचे सी एस सी आय डी होल्डर च्या सर्व चालक – मालक यांची सहविचार सभा शनिवार दिनांक 6 जुलै 2024 रोजी

आचरा–अर्जुन बापर्डेकर

मालवण तालुक्यातील सर्व VLE म्हणजेच महा ई सेवा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र, सी एस सी केंद्र, ग्रामपंचायतचे सी एस सी आय डी होल्डर च्या सर्व चालक – मालक यांची सहविचार सभा शनिवार दिनांक 6 जुलै 2024 रोजी सकाळी ठीक 10.30 वाजता अथर्व मंगल कार्यालय कुंभारमाठ ता. मालवण येथे आयोजित करण्यात आली आहे. यावेळी VLE यांच्या हिताच्या विविध विषयांवर चर्चात्मक निर्णय घेण्यात येणार आहेत. तसेच शासनाच्या विविध उपक्रमात VLE यांच्याकडून सक्षमपणे काम होण्यासाठी आवश्यक ते मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तालुक्यातील सर्वांच्या कामात एकसूत्रता आणण्याबाबत चर्चा करण्यात येणार आहे.
या आणि अशा अनेक महत्वपूर्ण विषयांवर यावेळी उहापोह करण्यासाठी ही सभा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी तालुक्यातील सर्व VLE यांनी वेळेत उपस्थित राहून सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष सुनील खरात.
यांनी केले आहे. अधिक माहिती साठी आणि नावनोंदणी साठी
9404933733 संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!