सिंधुदुर्गात कर्जमाफी मिळण्यासाठी अधिवेशनात आवाज उठवा- अर्चना घारे

अर्चना घारे; शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे वेधले जयंत पाटलांचे लक्ष
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा, काजू व भात उत्पादक शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात विधानसभेत लक्षवेधी मांडण्यात यावी आणि त्यांना योग्य तो न्याय देण्यात यावा, अशी मागणी शरद पवार राष्ट्रवादीच्या कोकण महिला अध्यक्ष अर्चना घारे यांनी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्याकडे केली आहे. नुकतीच त्यांनी मुंबई येथे जाऊन श्री. पाटील यांची भेट घेतली. यावेळी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष शामसुंदर राय, सचिव महेश चव्हाण, राष्ट्रवादी तुळस विभाग अध्यक्ष अवधूत मराठे, संदीप घारे आदी उपस्थित होते.