राज्यात अव्वल ठरलेल्याअर्पिता सामंतचा शिवसेने तर्फे गौरव

पुनर्मुल्यांकनानंतर ३ गुण वाढल्याने तिचे अर्पिताचे ५०० पैकी ५०० गुण

कुडाळ, प्रतिनिधी

वेंगुर्ले तालुक्यातील अण्णासाहेब देसाई विद्यामंदिर परुळे या प्रशालेची विद्यार्थिनी कु. अर्पिता अमेय सामंत हिने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता १० वी) मार्च २०२४ उत्तरपत्रिकेच्या पुनर्मुल्यांकनासाठी (फेरतपासणीसाठी) अर्ज केला होता. या पुनर्मुल्यांकनानंतर ३ गुण वाढल्याने तिचे एकूण गुण ५०० पैकी ५०० गुण (१००%) झाले आहेत. फेरतपासणीनंतर तिचे १०० टक्के गुण झाल्याने तिने राज्यात प्रथम येण्याचा सन्मान पटकाविला आहे. शिवसेना पक्षातर्फे तिचा सत्कार करण्यात आला यावेळी युवासेना सिंधुदुर्ग प्रमुख हर्षद डेरे, युवासेना तालुकाप्रमुख स्वप्निल गावडे, युवासेना उपतालुकाप्रमुख सचिन नार्वेकर, युवासेना कार्यकर्ते नितेश कुडतरकर, प्रेमानंद जाधव, म्हापण परुळे विभाग प्रमुख देवदत्त साळगावकर यावेळी उपस्थित होते

error: Content is protected !!