पर्यावरण संवर्धनासाठी युवाईने पुढाकार घ्यावा-डि जे टकले

आचरा–अर्जुन बापर्डेकर
अमर्याद वृक्ष तोडीने पर्यावरणाचा -हास होत आहे. यामुळे वाढत्या तपमानाचा धोका निर्माण झाला आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी वृक्षसंवर्धनासाठी पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली असल्याचे मत ज्ञानदीप माध्यमिक विद्यालय वायंगणी चे मुख्याध्यापक डि जे टकले यांनी व्यक्त केले.
केंद्र सरकार च्या माध्यमातून वृक्ष संवर्धनासाठी एक पेड मा के नाम उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या निमित्त
ज्ञानदीप माध्यमिक विद्यालय वायंगणी येथे आयोजित कार्यक्रमात ते उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते. यावेळी त्यांच्या सोबत वनपाल प्रकाश शिंदे, रामेश्वर वाचनालय आचरा चे कार्यवाह अर्जुन बापर्डेकर,इतर शिक्षक वर्ग आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना शिंदे यांनी एक पेड मा के नाम या उपक्रमाबाबत माहिती देवून वृक्षसंवर्धनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना स्पष्ट केले.यावेळी विविध प्रकारची दहा झाडे शिंदे यांनी शाळेत ला भेट दिली.

error: Content is protected !!