रोटरी क्लब वैभववाडी यांच्या मार्फत खारेपाटण हायस्कूलला बेंचेस, फलक आणि पुस्तके प्रदान

वैभववाडी येथे कार्यरत असणाऱ्या रोटरी क्लब कडून शेठ नवीन चंद्र मफतलाल विद्यालयास सुमारे 100 बेंचेस व दहा वर्ग फलक भेट देण्यात आले. खारेपाटन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ ही सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील एक अग्रगण्य शैक्षणिक संस्था आहे अंगणवाडी ते पदवीपर्यंत सुमारे 2000 विद्यार्थी या शैक्षणिक संकुलात ज्ञानार्जन करत आहेत त्यांना भौतिक पायाभूत सुविधा कशाप्रकारे मिळवून देता येतील असा एकच ध्यास विश्वस्त मंडळाने घेतला होता त्यातच नडगीवे गावचे सुपुत्र रोटरीयन व सध्या खारेपाटण शिक्षण प्रसारक मंडळामध्ये विश्वस्त असणारे सन्माननीय प्रशांतजी गुळेकर यांना वाटले की आपल्या वैभववाडी रोटरी क्लबच्या माध्यमातून आपण हा भौतिक सुविधाचा प्रश्न काही अंशी सोडवू शकतो लगेचच त्यांनी त्या काळचे क्लबचे अध्यक्ष सन्माननीय संतोषजी चिके यांना आपला मानस बोलून दाखविला सन्माननीय संतोषजी चीके यांनी लगेच होकार दिला व संस्थेच्या वरिष्ठ महाविद्यालयास 100 बेंचेस व ग्रंथालयास अनेक पुस्तके भेट दिली.ही मदत येथेच थांबली नाही संस्था अध्यक्ष सन्माननीय प्रवीण जी लोकरे यांच्या पुढाकाराने यावर्षी सुद्धा रोटरी क्लबचे अध्यक्ष सन्माननीय संजयजी रावराणे यांनी शेठ न म विद्यालयास 100 बेंचेस व दहा वर्ग फलक तसेच अनेक पुस्तके ग्रंथालयास भेट दिली अर्थात या सगळ्यांमध्ये क्लबचे सचिव सन्माननीय प्रशांतजी गुळेकर यांचा सिंहाचा वाटा आहे सदर वस्तूंचा हस्तांतरण सोहळा नुकताच शेठ न म विद्यालयात संपन्न झाला.या प्रसंगी क्लबचे अध्यक्ष सन्माननीय संजयजी रावराणे चार्टर्ड प्रेसिडेंट सन्माननीय संतोषजी चिके सन्माननीय प्रशांतजी गुळेकर संचालक प्रशांत कुळीये एक्झिक्युटिव्ह सेक्रेटरी सचिन रावराणे खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे उपाध्यक्ष भाऊ राणे सचिव महेश कोळसूलकर सहसचिव राजेंद्र वरूनकर विश्वस्त विजय देसाई प्रशालेचे मुख्याध्यापक संजय सानप पर्यवेक्षक संतोष राऊत व सर्व शाखांचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या प्रसंगी क्लबच्या सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.क्लबच्या मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना हा मदतीचा ओघ या संस्थेसाठी कायमच राहील असे आश्वासित केले.मुख्याध्यापक संजय सानप यांनी मनोगत व्यक्त करताना क्लबला धन्यवाद दिले व या मदतीचा आमच्या विद्यार्थ्यांना निश्चितच फायदा होईल असे ही आवर्जून सांगितले.संस्था अध्यक्ष प्रवीण लोकरे यांनी सुद्धा रोटरी क्लबचे आभार मानून स्कूल व्हॅनचा विषय बोलून दाखविला. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षक महादेव मोटे यांनी तर आभार पर्यवेक्षक संतोष राऊत यांनी मांडले.

अस्मिता गिडाळे, खारेपाटण

error: Content is protected !!