पदवीधर निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर बंदूका पुन्हा जमा करण्याचे आदेश…

शेतकर्यांमध्ये नाराजीः शेतीचा हंगाम सुरू झाल्याने पुर्नविचार करा, प्रशासनाकडे मागणी…
सावंतवाडी पदवीधर निवडणूक आचारसंहितेचा बाऊ करुन शेतकन्यांच्या बंदूका पुन्हा एकदा जमा करण्याचे आदेश जिल्हाधिकान्यांकडून देण्यात आले आहेत. नुकतीच तोकसभेची आचारसंहिता संपल्यानंतर या बंदूका परत करण्यात आल्या होत्या. परंतू ८ दिवसातच पुन्हा बंदूका जमा करण्याचा आदेश आल्यामुळे शेतकऱ्यात नाराजी आहे. दरम्यान पदवीधर निवडणूक आणि शेतकन्यांचा कोणताही दुरान्वये संबंध नाही. तर आता शेतीचा हंगाम सुरू झाला आहे. त्यामुळे शेतकन्यांचे नुकसान टाळण्यासाठी बंदूका जमा करण्याबाबत पुर्नविचार करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.





