नावीन्यपूर्ण उपक्रम व शिक्षणातून विद्यामंदिर हायस्कुल ने आपली क्षमता सिद्ध केली

मुख्याध्यापक पी जे कांबळे यांचे प्रतिपादन
प्रशालेच्या वाटचालीचा दिला आढावा
शिक्षण प्रसारक मंडळाच्या विद्यामंदिर प्रशालेत शिक्षणाव्यतिरिक्त कौशल्य व तंत्रशिक्षण दिले जात आहे. विद्यामंदिर प्रशालेत मराठी, इंग्रजी, सेमी इंग्रजी माध्यमांचे विभाग आहेत. या विभागांतील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण दिले जात आहे. विद्यामंदिर प्रशाला ही विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती व सर्जनशीलता जोपासणारी शाळा आहे, असे मुख्याध्यापक पी. जे. कांबळे यांनी सांगितले.
विद्यामंदिर प्रशालेत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत श्री. कांबळे बोलत होते. यावेळी शिक्षिका व्ही. व्ही. जाधव, शिक्षक अच्युत वणवे, जे. जे. शेळके, आर शेळके, दिव्या सावंत, शर्मिला केळुसकर, श्वेता करंबळेकर आदी उपस्थित होते.
कांबळे म्हणाले, शिक्षण प्रसारक मंडळाच्या विद्यामंदिर शाळेत प्राथमिक विभाग, इंग्लिश मीडियम स्कूल, माध्यमिक विभाग असून बालवाडी ते दहावी नवीन विद्यार्थ्यांसाठी प्रवेश सुरु आहेत. शासनाच्या नवीन अभ्यासक्रमाच्या धोरणानुसार प्रशालेत विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. बालवाडी मराठी माध्यम, बालवाडी इंग्रजी माध्यम, इयत्ता पहिली ते चौथी सेमी इंग्रजी माध्यम, पाचवी ते दहावी सेमी इंग्रजी व मराठी माध्यमिक विभाग असून संस्थेने पहिली ते दहावी इंग्लिश मीडियम स्कूल शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी अद्ययावत शिक्षण देणारी प्रशाला आहे. विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकाबरोबरच इतर कौशल्य व तंत्रशिक्षण दिले जात आहे. याशिवाय विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षण दिले जात आहे.प्रशालेच्या इयत्ता दहावीचा निकालाची परंपरा आहे, असे त्यांनी सांगितले.
शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय तवटे, चेअरमन डाॅ. राजश्री साळुंखे, सचिव विजय वळंजू व संस्थेच्या पदाधिकारी यांच्या अथक प्रयत्नाने व मार्गदर्शन प्रशालेत विद्याथर्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी प्रयत्न केले जात आहेत. प्रशालचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या प्रयत्नांतून प्रशालेचा दर्चा उंचावत आहे. विद्यार्थ्यांना आनंदायक शिक्षण देणारी व उज्ज्वल पंरपरा राखणारी एकमेव विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला आहे. शिक्षण सर्व स्तरांपर्यंत पोहोचावे यासाठी विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सर्जनशील विकसित करण्याचे काम करीत अाहे. त्यामुळे पालकांनी या प्रशालेत आपल्या पाल्यांना पाठवावे, असे आवाहन कांबळे यांनी केले.
कणकवली प्रतिनिधी