सिंगल युज प्लास्टिक पिशव्या वापर प्रकरणी कणकवली नगरपंचायत कडून 26 हजारांचा दंड
आठवडा बाजारा दिवशी नगरपंचायतची धडक कारवाई
कणकवली नगरपंचायत च्या वतीने आज मंगळवार आठवडा बाजारा दिवशी अचानक सिंगल युज प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर कारवाई करत तब्बल 26 हजार रुपयांचा दंड करण्यात आला. गेले काही दिवस मंगळवार आठवडा बाजारा दिवशी मुख्याधिकारी पारितोष कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही सातत्याने कारवाई सुरू असून आज केलेल्या कारवाई मध्ये प्रशासकीय अधिकारी श्री. अमोल अघम, आरोग्य लिपिक सतिश कांबळे,स्वच्छता निरीक्षक श्री.विनोद सावंत,श्रीम.ध्वजा उचले, श्री. राजेश राणे, श्रीम. निकिता पाटकर, श्रीम. रुचित ताम्हणकर, श्रीम. माधुरी डगरे श्रीम. ज्योती देऊलकर व इतर नगरपंचायतीचे कर्मचारी सहभागी झाले होते.यावेळी प्लास्टिक पिशव्या जप्त करत दंड वसूल करण्यात आला.
दिगंबर वालावलकर /कणकवली