कलमठ मधील चंद्रकांत मेस्त्री यांचे निधन
![](https://kokannow.in/wp-content/uploads/2024/06/IMG-20240611-WA0003-scaled.jpg)
भाजप तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, कलमठ सरपंच संदीप मेस्त्री यांना पितृशोक
कणकवली तालुक्यातील कलमठ – सुतारवाडी येथील रहिवासी व सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे कणकवली कार्यालयातील कर्मचारी चंद्रकांत बाळकृष्ण मेस्त्री (वय 62) यांचे आज हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. अस्वस्थ वाटू लागल्याने ते कणकवलीतील खाजगी रुग्णालयात तपासणी करण्याकरता गेले होते. मात्र या दरम्यान त्यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का बसल्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्या प्रकृती अस्वस्थ्याची माहिती मिळताच आमदार नितेश राणे यांनी देखील खाजगी रुग्णालयात धाव घेत उपचाराची माहिती घेतली. भाजपाचे तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री व कलमठ गावचे सरपंच संदीप मेस्त्री यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहित मुलगी, मूलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
दिगंबर वालावलकर कणकवली