सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ७ सहाय्यक पोलीस निरीक्षकांना पदोन्नती

सिंधुदुर्गनगरी, राज्य शासनाने आज पोलीस दलात कार्यरत असलेल्या ४४७ सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना पोलीस निरीक्षक या पदावर पदोन्नतीचे आदेश काढले आहेत. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात कार्यरत असलेल्या सात सहाय्यक पोलीस निरीक्षकांचा समावेश आहे. राज्य शासनाने पदोन्नतीने पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती दिलेल्या अधिकाऱ्यांमध्ये बांदा येथे कार्यरत असलेले विकास बडवे यांचा समावेश असून त्यांना सिंधुदुर्ग जिल्हा देण्यात आला आहे. आचरा येथे कार्यरत असलेल्या सुनील जाधव यांना कोकण विभागातील राज्य गुन्हा विभागात नियुक्ती देण्यात आली आहे. विजयदुर्ग येथे कार्यरत असलेल्या मनोज सोनवलकर यांनाही सिंधुदुर्ग देण्यात आला आहे. कणकवली येथे कार्यरत असलेल्या मनोज पाटील यांना मुंबई शहर देण्यात आले आहे. निवती येथे कार्यरत असलेल्या जयेश ठाकूर यांना पुणे महसूल विभागातील गुन्हा अन्वेषण विभाग देण्यात आला आहे. वेंगुर्ले येथे कार्यरत असलेल्या प्रशांत जाधव यांना मुंबई शहर देण्यात आले आहे. सावंतवाडी येथे कार्यरत असलेले श्रीकांत इंगवले यांची मुंबई शहर येथे पदोन्नतीने बदली मिळाली आहे. पदोन्नती मिळालेल्या ६ पैकी ४ अधिकाऱ्यांची जिल्ह्याबाहेर बदली झाली आहे. तर ३ अधिकाऱ्यांना सिंधुदुर्गच देण्यात आला आहे

🚨 अत्यंत तातडीची विनंती – आमची झेना हरवली आहे 🚨
आमची लाडकी पाळीव कुत्री “झेना” (पॉमेरियन जात) दिनांक 7 फेब्रुवारीच्या रात्रीपासून हरवली आहे. ती आमच्या कुटुंबाचा एक भाग आहे.
🐶 नाव: झेना
🐾 जात: पॉमेरियन
🎨 रंग: तांबूस/तांबड्या रंगाचे केस
📏 उंची: सुमारे 1 फूट
🎂 वय: 2 वर्षे
ती कोणाला दिसल्यास, सापडल्यास किंवा तिच्याबद्दल कोणतीही माहिती मिळाल्यास कृपया त्वरित संपर्क साधावा.
झेनाला सुरक्षित परत आणून देणाऱ्यास योग्य बक्षीस दिले जाईल.
📍 पत्ता: धुरीवाडा, मालवण
(तोंडवळकरांच्या चक्कीच्या बाजूचे घर)
📞 संपर्क: 7506829118
— कौस्तुभ चंद्रकांत फोंडबा
🙏 कृपया ही पोस्ट जास्तीत जास्त शेअर करा. तुमची एक शेअर आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. धन्यवाद.
error: Content is protected !!